Published On : Tue, Mar 16th, 2021

दुर्बल घटक समितीचा निधी अखर्चित

मनपाच्या दुर्बल घटक समितीच्या शिष्टमंडळांनी घेतली सुभाष पारधी यांची भेट

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या दुर्बल घटक समितीच्या अध्यक्षा कांताताई रारोकर यांच्या नेतृत्वात समितीच्या सदस्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी समितीला देण्यात येणारा निधी नागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे वर्षभरात पूर्णत: खर्च केला जात नाही, अशी व्यथा त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून मांडली. श्री. पारधी यांना सांगितले की लवकरच ते या विषयावर मनपा आयुक्तांशी चर्चा करुन आवश्यक निर्देश देतील.

शिष्टमंडळात उपमहापौर मनीषा धावडे, समिती सदस्य आयशा उइके, लिला हाथीबेड, विजय चुटेले, शकुंतला पारवे, नगरसेवक नागेश सहारे, लखन येरावार, महेंद्र धनविजय, भाजपच्या अनु, जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, अजय हाथीबेड, प्रमोद संतापे यांचा समावेश होता.