Published On : Wed, Apr 10th, 2019

आम्ही लढतो जिंकण्यासाठी…… जिंकण्याची हौसच भारी……

Advertisement

विदर्भ प्राथ.शिक्षक संघ व वसंतराव नाईक कर्मचारी संघटनेच्या मागणीस यश.

कन्हान : – लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहून राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या बिएलओंना त्या दिवशीचे मानधन २५० रुपये देण्यात येणार आहे. निवडणूकीच्या मानधनाची मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ व वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे निवडणूक अधिकार्‍यांना १६ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात केली होती .

Gold Rate
16 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000 /-
Gold 22 KT ₹ 1,22,800 /-
Silver/Kg ₹ 1,91,300/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमचंद राठोड व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे विभागिय संघटन सचिव खिमेश बढिये यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पारशिवनी तहसीलदार वरुण सहारे यांंची भेटघेऊन बिएलओंना मतदानाच्या दिवशी मानधन मिळण्या संदर्भात चर्चा केली.

यात निवडणूक अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पडण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) प्रयत्नरत असतात.११एप्रिलला होणाऱ्या निवडणुकी च्या दिवशी बिएलओ पूर्ण वेळ मतदान केंद्रावर मतदार यादीसह उपस्थित राहून मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. मात्र निवडणूक विभागा तर्फे केवळ मतदान अधिकार्‍यांनाच त्या दिवशीचे मानधन देण्यात येते. तर बिएल ओंना कुठलेही मानधन देण्यात येत नाही. त्यामुळे बिएलओंमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या सर्वांना निवडणूक मानधन देण्यात येत असताना बिएलओं ना सुध्दा मानधन देण्यात यावे, या संदर्भातील निवेदन १७ व्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व राज्य निवडणूक आयोगा कडे तहसीलदार पारशिवनी यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनावर निर्णय घेत बिएलओंना मतदानाच्या दिवशीचे २५० रुपये मानधन देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वरुण सहारे यांनी सांगितले.

हि रक्कम बिएलओंना मतदानाच्या दिवशीच पोलींग आॅफीसर कडून मिळणार आहे. उपरोक्त मागणी वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमचंद राठोड, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे विभागिय संघटन सचिव खिमेश बढिये, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका संघटक भीमराव शिंदेमेश्राम, जिल्हा ग्रामीण संघटक गणेश खोब्रागडे, प्रशांत वैद्य, विशाल बमनोटे, किशोर जिभकाटे, भाविका गेहानी, मनोज डोंगरे, शैलेश सोलंकी, टि.आर.चापरे, सुनिता देशमुख, नलिनी दांडेकर, कविता मसराम, जी.डी.राठोड, श्री कुरसुंगे, अनिल नागपुरे यांच्यासह बिएलओंनी केली होती.
शिक्षकांच्या प्रश्नासाठी युद्ध आमचे सुरू…. जिंकू किंवा मरु. . . .

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement