Published On : Tue, Mar 26th, 2024
By Nagpur Today Nagpur News

रेकॉर्डब्रेक मतांनी आम्ही विजयी होऊ; मुनगंटीवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे विधान

नागपूर/चंद्रपूर : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भाजपने आतापर्यंत २३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्याने या मतदारसंघात भाजपाने उमेदवारांसह प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाच्या पहिल्या उमेदवाराने आज आपला निवडणुकीचा फॉर्म दाखल केला.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदा रेकॉर्डब्रेक मतांनी आम्ही विजयी होऊ, असे ते म्हणाले आहेत.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन, आणि चंद्रपूरची आई महाकालीचे दर्शन घेऊन आम्ही आज सुधीर मुनगंटीवार यांचा फॉर्म भरला आहे. आज नवी सुरुवात झाली असून शेवटही चांगलाच होईल. महाराष्ट्रात आम्ही आमचे सर्व जुने रेकॉर्ड मोडू, असेही ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेले मत मोदींना दिलेले मत ठरेल,असेही फडणवीस म्हणाले.

Advertisement
Advertisement