Published On : Sun, Aug 29th, 2021
By Nagpur Today Nagpur News

क्रीडा क्षेत्रात मनपाचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करणार

Advertisement

क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांचे प्रतिपादन : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : आज ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ खेळाकरिता खूप मोठा दिवस आहे. दिवसेंदिवस शहरात तरुण पिढीमध्ये खेळाचे महत्व खूप वाढले आहे. यासाठी नागपूर महानगरपालिका सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुढेही क्रीडा क्षेत्रात मनपाचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मनपा क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने केले.

Gold Rate
June 09 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 152,700 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,43,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रविवारी (ता. २९) मनपा मुख्यालयातील क्रीडा समिती सभापती कक्षात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीप्रीत्यर्थ मनपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने आणि उपसभापती लखन येरेवार यांनी मेजर ध्यानचंद यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी क्रीडा समितीचे सदस्य प्रमोद कौरती, शेषराव गोतमारे, उपायुक्त विजय देशमुख, क्रीडा नियंत्रक अधिकारी नितीन भोळे आणि क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात मेजर ध्यानचंद यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न मिळण्यासाठी मनपातर्फे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच क्रीडा क्षेत्राला प्राध्यान देत मनपाचे क्रीडा धोरण पारित केले असल्याचेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

नागपूर शहरामध्ये विविध खेळांमध्ये चांगले क्रीडापटू घडावेत यादृष्टीने मनपाद्वारे आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी उपायुक्त विजय देशमुख म्हणाले. प्रतिभा असून केवळ परिस्थितीमुळे मागे राहणा-या खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देत त्यांना संधी मिळवून देण्यात येईल. शहरामध्ये खेळासाठी पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून उत्तम खेळाडू घडावेत यासाठी सुद्धा पुढेही मनपा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी केले. आभार क्रीडा नियंत्रक अधिकारी नितीन भोळे यांनी मानले.

Advertisement
नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की लूट.. #nagpurnews #Crime #LatestNews

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews #sucides

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...

विकास ठाकरे का 5 करोड़ मानहानि दावा; मार्मिक के लेख पर ठाकरे आक्रामक #nagpurnews  #latestnews

विकास ठाकरे का 5 करोड़ मानहानि दावा; मार्मिक के लेख पर ठाकरे...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges