Published On : Tue, Jul 23rd, 2019

पंडित दिनदयाल योजनेचा लाभ प्रत्येक ग्राहककापर्यंत पोहोचवू:-जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे

कामठी:-पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्याला मिळावा व सरकारच्या या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्याअ उदेशाने ही योजना प्रत्येक ग्राहकांपर्यंत पोहोचवू असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी आज कामठी तालुक्यातील घोरपड-शिरपूर गट ग्रामपंचायत मध्ये उज्वला गॅस योजनेतील गॅस शेगडी वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.

याप्रसंगी कोठारी गॅस एजन्सी च्या वतीने घोरपड ग्रामपंचायत परिसरातील 18 गरजू कुटुंबाना उज्वला गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य , शशी कोठारी, तिवारी, तसेच कामठी तालुक्यातील सर्व केरोसीनधारक व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा मुख्य उद्देश शिधापत्रिका वाटप, गॅस कनेक्शन, लाभार्थ्यांना धान्य वितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे आहे.जे कुटुंब पात्र असतील अशा कुटुंबाना 100 टक्के धान्य वाटप करायचे आहे तसेच धुरमुक्त महाराष्ट्र व लाकुडतोड थांबवणे या उद्देशाने केंद्र सरकार तर्फे उज्वला गॅस योजने अंतर्गत 100 टक्के कुटुंबाना गॅस कनेक्शन वाटप करायचे आहे .

सरकारच्या येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना पोहोचविण्यास पूर्ण तो प्रयत्न करू व सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी आपल्या क्षेत्रात प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार शशी कोठारी यांनी मानले.