Published On : Tue, Mar 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकू भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

ब्रह्मपुरीतील कॉग्रेसच्या अनेक पदाधिका-यांचा, कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश
Advertisement

नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकितही भारतीय जनता पार्टी विजय मिळवेल,असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मंगळवारी श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.त्यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते.

ब्रह्मपुरी विधानसभेतील गौरव अशोक भैय्याजी , नगर परिषद माजी गटनेते विलास विखार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. सतीश कावळे, पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव लांजेवार , सुरेश दर्वे यांसह अनेकांचे श्री. बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला.

Gold Rate
Wednesday March 2025
Gold 24 KT 87,800 /-
Gold 22 KT 81,700 /-
Silver / Kg 99,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


यावेळी श्री. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्यासाठी ह्या सर्वांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे लक्ष्य ठेवून भाजपा कार्य करत आहे. भाजपा नेतृत्व आणि कार्यावर विश्वास ठेवूनच मागच्या ५० वर्षांपासून कॉंग्रेसशी जोडलेल्या भैय्याजी कुटुंबातील अशोक भैय्याजी यांचे पुत्र गौरव , श्री. विखार , विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक श्री. कावळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

या सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल. नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांनी भाजपा सदस्य नोंदणी अभियानात सामील व्हावे , प्रमुख नेत्यांना सक्रीय सदस्य बनवावे , भाजपा संघटना वाढीचे काम करावे असे आवाहन श्री बावनकुळे यांनी केले. पक्ष संघटना तुमच्या सदैव पाठीशी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.

भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुखदेव खेने, स्वप्नील सावरकर, मोहन वैद्य़, निलेश चिंचुरकर आदींचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement