Published On : Sat, Aug 14th, 2021
By Nagpur Today Nagpur News

आपण हस्तक्षेप करावा, शिवसेनेच्या दहशतीमुळे काम बंद पडतील, गडकरींनी पत्रात काय म्हटलंय वाचा

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्फोटक पत्र लिहिले आहे. शिवसेनेच्या नियमबाह्य आणि दहशतीमुळे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे बंद पडतील असा इशारा नितीन गडकरींनी पत्रातून दिला आहे. शिवसेना आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडलं आहे. काही काम देखील या लोकप्रतिनिधींनी बंद पाडली आहेत. लोकप्रतिनिधीची दहशत सुरुच राहिली तर महाराष्ट्र्ताली राष्ट्रीय महामार्गावरील काम मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल असा थेट इशारा नितीन गडकरी यांनी पत्रातून दिला आहे.

नितिन गडकरींनी काय म्हटलंय वाचा

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून काही प्रगतीपथावर आहेत. मात्र अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषत: विशेषतः वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडते अहे.

अकोला व नांदेड २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची काणे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज -२मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्य आहे. परंतू, प्रस्तुतर बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकलप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आलं आहे.

या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे. त्या स्थितीमध्ये काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

पुलगाव-कारंजा-मालेगाव-महेकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतू वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते. अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी कर्मचारी कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

हे असंच चालतं राहिलं तर महाराष्ट्र्ताली राष्ट्रीय महामार्गावरील काम मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.

ही कामे डिस्कोप केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा अशी माझी विनंती आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement