Published On : Mon, Feb 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

वंजारी नगर जलकुंभाची स्वच्छता फेब्रु १५ आणि बुधवार बाजार जलकुंभ १६ रोजी

नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर धंतोली झोन जलकुंभ स्वच्छता मोहीम :२०२२-२३
Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे आपली विशेष वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२-२३ सुरु केलीली आहे. पुढील आठवड्यात या अंतर्गत धंतोली झोन मधील २ जलकुंभ अनुक्रमे : वंजारी नगर (नवीन) १५ फेब्रुवारी (बुधवारी ) आणि बुधवार बाजार जलकुंभ १६ फेब्रुवारी (गुरुवारी) स्वच्छ करण्यात येणार आहेत.

नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर ने गेल्या २०१२ पासून दरवर्षी नित्यनियमाने सुरु केलेली आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान, फक्त ८ तासात नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर च्या अत्याधुनिक प्रणाली द्वारे स्वच्छ करण्यात येतात.

या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात दिलेल्या तारखेनुसार पाणीपुरवठा बाधित राहील., टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा ह्या दरम्यान शक्य होणार नाही .तरीही नागरिकांनी आपल्या परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणी साठा करून ठेवावा हि विनंती

धंतोली झोन मधील फेब्रु. १५ आणि १६ रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग

(बुधवार ) फेब्रु १५ -वंजारी नगर (नवीन) जलकुंभ: बजरंग नगर, वेळेकर कॉलोनी, विश्वकर्मा नगर, ताज नगर, सावित्रीबाई फुले नगर, बोधिवृक्ष नगर, म्हाडा क्वार्टर , आदिवासी कॉलोनी , पोलीस क्वार्टर, शिवराज नगर, रघुजी नगर, सोमवारी क्वार्टर , तुकडोजी नगर, जुने सोमवार पेठ आणि रमाई नगर व इतर परिसर.

Advertisement

(गुरुवार) १६ फेब्रुवारी-बुधवार बाजार जलकुंभ :रेशीमबाग, चंदन नगर, सिरसपेठ, वकील पेठ, हनुमान नगर , महेश कॉलनी, सोमवारी पेठ, पीटीएस क्वार्टर्स , सराई पेठ आणि एम आय जी कॉलनी..

ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कुठंल्याही प्रकारच्या अधिक माहितीकरिता नागरिक नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर च्या नि:शुल्क मदत क्रमांक १८००- २६६-९८९९ वर संपर्क करू शकतात.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.