Published On : Sat, Oct 20th, 2018

थकीत पाणी बील व अवैध कनेक्शनबाबत मनपाचा कठोर पवित्रा

Advertisement

सोमवारपासून प्रशासन व पोलिसांच्या उपस्थितीत करणार कारवाई

नागपूर: थकीत पाणी बिल व अवैध नळ कनेक्शन याबाबत नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून सोमवार (ता. २२) पासून मनपा प्रशासन, जलप्रदाय विभाग, ओसीडब्लू आणि पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिला.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

थकीत पाणी बिल वसूली व अवैध नळ कनेक्शन संदर्भात सभापती विजय झलके यांच्या कक्षात शनिवारी (ता. २०) बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला जलप्रदाय समिती उपसभापती श्रद्धा पाठक, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाचे उपअभियंता प्रदीप राजगिरे, मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे राहुल कुळकर्णी, राजेश कारला प्रामुख्याने उपस्थित होते.

यंदाच्या पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने जलाशयांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे येणा-या उन्हाळ्यात शहरात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरात निर्माण होणा-या पाण्याच्या समस्येशी सामना करण्यासाठी आधीपासूनच तयारी करणे आवश्यक आहे. यासाठी आतापासून यांसंबंधी पाउल उचलणे आवश्यक आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध नळ कनेक्शन सुरू आहेत. या नळ कनेक्शनमुळे इतरांना पुरेसे पाणी मिळत नाही. या अवैध नळ कनेक्शन धारकांवर येत्या सोमवारपासून कठोर कारवाई करण्यात येईल.

याशिवाय मोठ्या प्रमाणात नागरिकांकडे थकीत पाणी बील आहे. नागपूर महानगपालिकेने २०१६ व २०१७ या वर्षी पाणी कर अभय योजनेंतर्गत नागरिकांना थकीत पाणी बिलामध्ये सवलत दिली होती. मात्र यानंतरही पूर्णपणे पाणी कर जमा करण्यात आले नाही. त्यामुळे आता थकीत पाणी कर धारकांबाबत कोणतिही हयगय न करता थेट कारवाई करण्यात येईल. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान कोणतिही अनुचित घटना घडू नये यासज्ञठी ‘स्पेशल टास्क फोर्स’ तैनात करण्यात आली असून या फोर्सच्या उपस्थितीतच ही कारवाई करण्यात येणार आहे, असेही जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांनी सांगितले.

थकीत पाणी बिल धारकांवर होणारी कारवाई टाळण्यासाठी सर्वच थकीत पाणी कर धारकांनी संबंधित झोनमध्ये कर भरणा करून कारवाई टाळावी, असे आवाहनही सभापती विजय (पिंटू) झलके यांनी यावेळी केले.

Advertisement
Advertisement