नागपूर : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर ह्यांनी ७०० मी मी व्यासाच्या कळमना मुख्य जलवाहिनीवरील, डिप्टी सिग्नल चौकात उध्दभवलेल्या गळती ला बंद करण्यासाठी येत्या ११ ऑगस्ट (शुक्रवारी) १० तासांचे (सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत) शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. ह्या तांत्रिक शटडाऊन मुळे लकडगंज झोन मधील ४ जलकुंभाचा : भांडेवाडी जलकुंभ, सुभान नगर जलकुंभ , पारडी १ आणि पारडी २ जलकुंभ ह्याचा पाणीपुरवठा शुक्रवारी बाधित राहणार आहे.
ह्या शटडाऊनमुळे लकडगंज झोन मधील पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :
पारडी – १ जलकुंभ: अंबे नगर , राम भूमी , राणी सती माता सोसायटी, सुरेंद्र नगर, स्वागत नगर, सुंदर नगर, भोळे नगर, आणि दुर्गा नगर आणि इतर भाग
पारडी –२ जलकुंभ : श्याम नगर नवीन नगर, दुर्गा नगर, शिवशक्ती नगर, गणेश मंदिर परिसर आणि भवानी नगर
सुभान नगर जलकुंभ: विजय नगर, नेताजी नगर, गुलमोहर नगर आणि भरतवाडा व इतर भाग
भांडेवाडी जलकुंभ: धरतीमाता , पवन शक्ती नगर , साहिल नगर , वैष्णोदेवी नगर आणि प्रधानमंत्री आवास योजना वसाहत (तरोडी-खुर्द )
मनपा-OCW यांनी नागरिकांना आपल्या वापरासाठी पाण्याचा संचय करून सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात भांडेवाडी जलकुंभावरून नेहरू नगर झोन मध्ये होणाऱ्या नॉन -नेटवर्क तसेच इतर भागामध्ये टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्याया गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.
अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





