Published On : Thu, Aug 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्यभरात येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा;विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

Advertisement

नागपूर : राज्यात हवामान विभागाने येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हे पाहता आजपासून ते ५ ऑगस्टपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आले आहे.

विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’-
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतकेच नाही तर कोकणातील रायग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Gold Rate
26 May 2025
Gold 24 KT 95,800/-
Gold 22 KT 89,100/-
Silver/Kg 98,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement
Advertisement