Published On : Thu, Oct 29th, 2020

प्रभाग क्र. ३० मधील विकास कामांचे भूमिपूजन

नागपूर: नागपूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३० येथील विकास कामांचे भूमिपूजन दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभाग क्र. ३० येथील शंकरशाही मठाजवळील गल्ल्यांच्या फ्लोरिंगचे हे काम आहे. यावेळी आमदार मोहन मते यांच्यासह दक्षिण नागपूरचे अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे, प्रभागाचे नगरसेवक नागेश सहारे, स्नेहल बिहारे, नितेश समर्थ, श्रीमती राय, ख़तीजा बी शेख (अम्मा), कैलास धोंगडे, उषाताई झामरे, अंजली गौतम, पूजा राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना आमदार मोहन मते म्हणाले, कोरोना महामारीमुळे गेली सात महिने विकासकामे रखडली होती. आरोग्य सेवा ही प्राथमिकता असल्याने संपूर्ण यंत्रणेने त्यावर लक्ष केंद्रीत केले होते. नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना नियंत्रणात असून आता विकासकामांनाही हळूहळू सुरुवात होत आहे. प्रभाग क्र. ३०च्या नगरसेवकांनी यासाठी आता पुढाकार घेतला असून रखडलेली कामे लवकरच पूर्ण होतील असा विश्वास दिला.

नगरसेवक नागेश सहारे म्हणाले, प्रभागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र विकासकामे करतानाच नागरिकांनी कोरोनासाठी असलेले नियम पाळायलाच हवे. यापुढे आम्ही विकासकामांनाही वेग देणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.