Published On : Fri, Dec 28th, 2018

वांजरी जलकुंभ स्वच्छता डिसेंबर २९ व शांती नगर जलकुंभ स्वच्छता ३० ला

शटडाऊन/जलकुंभ स्वच्छता दरम्यान टँकरपुरवठा नाही

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी २९ डिसेंबर रोजी वांजरी जलकुंभाची तर ३० डिसेंबर रोजी शांती नगर जलकुंभाची स्वच्छता सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान करण्याचे ठरविले आहे. यामुळे त्या त्या दिवशी दोन्ही जलकुंभाचा पाणीपुरवठा बाधित राहील. या शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील बंद राहील.

२९ डिसेंबर रोजी वांजरी जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: विनोबा भावे नगर, नागसेनवन, राजीव गांधी नगर, पांडुरंग नगर, गुलशन नगर, वनदेवी नगर, संतोष नगर, ओमसाई नगर, वैष्णोदेवी नगर, कलमना बस्ती, वाजपेयी नगर


३० डिसेंबर रोजी शांतीनगर जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: शांतीनगर, महेश नगर, साईबाबा नगर, तुलसीनगर, मुदलियार लेआऊट, हनुमान नगर, रामसुमेर बाबा नगर, मस्के लेआऊट, बांगडेप्लॉट, RPF क्वार्टर, आंबेडकर चौक, गुत्बी कॉलोनी, म्हाडा कॉलोनी, करुणा नगर.

येथे उल्लेखनीय आहे कि, मनपा-OCW यांनी जलकुंभ स्वच्छतेवर अधिकाधिक भर देत स्व-विकसित प्रणालीद्वारे जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे.

नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी OCW ने प्रत्येक जलकुंभ दरवर्षी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांना होणाऱ्या गैरसोईबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.