Advertisement
नागपूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काट्याची टक्कर समजली जाते.
सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. यातच पश्चिम नागपूर मतदारसंघातील मतमोजणी थांबवण्यात आली आहे.
दुसऱ्या फेरीत बूथ क्रमांक 23 वर मशिनवर दोन सील असल्याबद्दल काँग्रेस प्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे.
कंट्रोल युनिटवर क्रमांक जुळत नसल्याची तक्रार निवडणूक रिटर्निंग अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली आहे.