Published On : Wed, Nov 3rd, 2021
amchi nagpur | By Nagpur Today Nagpur News

मनपा मंगळवारी झोन अंतर्गत विविध मस्जीद तर्फे मुस्लीम समुदायाचे स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणात कोव्हीड लसीकरण संपन्न

नागपूर : नागपूर महानगरपालिका मंगळवारी झोन कार्यालय तर्फे कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या पुढाकाराने तसेच मनपा चे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ . संजय चिलकर, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ . नरेन्द्र बहिरवार, मंगळवारी झोनचे सहाय्यक आयुक्त विजय हूमणे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन अंतर्गत सदर मोठी मस्जीद, छावणी मस्जीद, अहबाव मस्जीदजाफर नगर , ईदगाह मैदान, नूरी कॉलोनी मस्जीद व गड्डीगोदाम अल कुरेश मस्जीद येथे एका आठवडयात मोठ्या प्रमाणात कोव्हीड लसीकरण करण्यात आले .

विश्वस्त मस्जीद अल्कूरैश गड्डीगोदाम , जमियातूल उलमा हिंद यूनीट गडडीगोदाम यांच्या सहकार्याने मुस्लीम समुदायानी उत्सर्फूत सहभाग घेतला .गड्डीगूदाम अल कुरैश मस्जीदचे इमाम मौलाना मुस्तफा यांनी सर्वप्रथम लसीकरण करवून घेतले व कोरोना आजाराला हद्द पार करण्यासाठी समुदायाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरण करवून घेण्याचे आव्हान केले .


झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक उर रहेमान खान यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनाखाली समन्वयक पुरुषोत्तम कळमकर, डॉ . दानीश, परिचारीका रेशमा नाज, एकता रामटेके, फिरदोस अली तसेच संगणक चालक देव बोंदरे , चंद्रशेखर निखारे या वैद्यकीय पथकाने अथक परिश्रम घेऊन १८ वर्ष वयोगटापूढील १००९ नागरीकांचे लसीकरण करवून घेतले व या मोहीमेच्या यशस्वीतेकरीता आरीफ कूरेशी, सोहेल अहमद कुरेशी, जाहीद कुरेशी, सैय्यद एजाज, ओवेस कादरी, अल्ताफ अहमद, मो कैसर इ. कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .