Published On : Tue, Jun 12th, 2018

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तोडले ताज महाल चे प्रवेशद्वार

Advertisement

आग्रा : जगातल्या सात आश्चर्या पैकी एक असलेल्या ताज महालाचे मुख्य प्रवेशद्वार रुंदी करणाचे काम प्रस्तावित आहे. या मुख्य प्रवेशद्वारामुळे ४०० वर्ष जुने असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिराचा मार्ग अडणार असल्याने काल विश्व हिदू परिषद ने या प्रवेशद्वाराचे निर्माण थांबविण्यासाठी आंदोलन केले. व प्रवेशवद्वाराचे बांधकाम तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी विश्व हिदू परिषदेचे कार्यकर्ते हिंसक झाल्याने पोलिसांनी ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

या मध्ये रवी दुबे, मोहित शर्मा, निरंजन पाठक माधव वर्मा या कार्यकर्त्यांवर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराची लोखंडी चौकाट आणि मेटल डिटेक्टर मशीन तोडली असे सांगण्यात येत आहे. ताज महालाच्या रावेश्द्वारामुळे ४०० वर्ष जुन्या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या मार्गात अडथला येत आहे.

त्यामुळे हे प्रवेशद्वार न बनविण्यासाठी विश्व हिंदू परिषद आंदोलन करीत आहे. दुसरीकडे प्रशासनाने मंदिरासाठी दुसरा मार्ग बनवून देण्याचा प्रस्ताव दिला आहे पन विश्व हिंदू परिषदेला तो मान्य नाही त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.