Published On : Tue, May 4th, 2021

महात्मा गांधी इंग्लिश मिडीयम हायस्कुलमध्ये आभासी उन्हाळी कार्यशाळा

श्री विद्यार्थी सुधार संघ अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी इंग्लिश मिडीयम हायस्कुल, वानाडोंगरी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आभासी उन्हाळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे योगासने, झूम्बा डान्स, विविध आर्ट बनविणे,क्ले मॉडेलिंग, वेदिक गणित,टाकाऊ निरुपयोगी वस्तूंपासून प्रतिकृती बनविणे आदी विषयी माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळा दिनांक ०३ मे ते १५ मे २०२१ पर्यंत राहणार आहे. कार्यशाळा पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्गाकरिता आयोजित केली आहे.

कार्यशाळेचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र पारशिवनीकर, पर्यवेक्षिका दिपाली कोठे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यामध्ये असलेले सुप्त गुण याची ओळख करणे व त्याला चालना देणे हा होय. विद्यार्थ्यांचा भरघोष सहभाग या कार्यशाळेत दिसून येत आहे.
कार्यशाळेच्या यशस्वीतेलाप्रीती धमगाये, प्रिया डाखळे, कल्पना हिवराळे, माधवी वांधे, रामचंद्र वाणी यांचे सहकार्य लाभत आहे.