Published On : Fri, Sep 2nd, 2022
By Nagpur Today Nagpur News

हास्‍यरसाने न्‍हाऊन निघाले रसिक आयटी पार्क परिसरातील नागरिकांनी केली ‘हसते रहो’ साठी गर्दी

Advertisement

नागपूर: विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने गणेशोत्सवात प्रसिद्ध स्‍टँडअप कॉमेडियन एहसान कुरेशी, विविध आवाजांचे जादूगार राहूल इंगळे आणि रँचोसोबत अवतरलेले विनोदवीर राजकुमार यांनी रसिकांना हास्‍यरसात न्‍हाऊ घातले.

‘व्‍हीआयपीएलचा राजा’ गणेशोत्‍सवांतर्गत शुक्रवारी गायत्रीनगर येथील व्हीआयपीएल आयटी पार्कच्या आवारात ‘हसते रहो’ या कॉमेडी शोचे आयोजन करण्‍यात आले होते. तत्‍पूर्वी, पोलिस आयुक्‍त अम‍ितेश कुमार, अपर्णा अम‍ितेश कुमार, परिणय फुके यांनी ‘व्‍हीआयपीएलचा राजा’ ला भेट दिली व आरती केली. यावेळी भाजपाचे माध्‍यम प्रभारी रघुना‍थ पांडे, वरिष्‍ठ पत्रकार गजानन जानभोर व व्‍हीआयपीएलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक प्रशांत उगेमुगे यांची प्रमुख उपस्‍थि‍ती हेाती.

कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाले. नर्तकांनी अतिशय देखणे नृत्‍य सादर करीत मोठ्या संख्‍येने जमलेल्‍या परिसरात नागरिकांची मने जिंकून घेतली. त्‍यानंतर राजकुमार आपल्‍या रँचो या बाहुल्‍यासह मंचावर अवतरले. या दोघांनी रसिकांना अर्धा तास हसवत ठेवले. त्‍यानंतर आवाजाचे जादूगार राहूल इंगळे यांनी मिमिक्रीच्‍या माध्‍यमातून रसिकांच्‍या मनाचा ठाव घेतला. अहसान कुरेशी यांनी मंचावर आगमन करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढचा अर्धा तास त्‍यांच्‍या विनोद, विनोदी कवितांनी रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.