
नागपूर : शहरातील महाल परिसरात मंगळवारी उशिरा रात्री इंस्टाग्रामवरील वादातून हिंसाचार उसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरण आणि सोशल मीडियावरील मैत्रीच्या वादातून काही तरुणांनी धारदार शस्त्रे घेऊन परिसरात दहशत माजवली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाला आपल्या माजी प्रेयसीची दुसऱ्या तरुणासोबत इंस्टाग्रामवर मैत्री झाल्याचा राग होता. याच कारणावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. सूड उगवण्याच्या उद्देशाने संबंधित तरुणाने सुमारे १२ साथीदारांसह रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास गाडीखाना आणि जोहरीपुरा भागात धडक दिली.
हातात तलवारी व इतर शस्त्रे घेऊन आलेल्या या टोळीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सहापेक्षा अधिक दुचाकी वाहनांची तोडफोड केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत काही आरोपींना घटनास्थळीच पकडून त्यांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस ठाणे येथील पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण १२ तरुणांचा सहभाग उघड झाला असून त्यापैकी काही जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...
प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...
वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...
नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...
वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra
संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...




