नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी परिसरात मध्यरात्री एका कुटुंबाच्या घरावर हल्ला, आगजनी आणि तोडफोडीची धक्कादायक घटना घडली. जुन्या वैमनस्यातून चार अज्ञात हल्लेखोरांनी घराला लक्ष्य केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इसासनी येथील वार्ड क्रमांक ६ मध्ये ग्रामपंचायतीच्या मागे राहणारे दत्तात्रेय शिवाजी गायकवाड यांच्या घरावर मंगळवारी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्लेखोरांनी घराबाहेर आग लावल्याने वीजमीटरसह घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकी जळून खाक झाल्या.
यानंतर आरोपींनी घरावर दगडफेक करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या हल्ल्यात घराचा मुख्य दरवाजा देखील नुकसानग्रस्त झाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी जीव वाचवण्यासाठी घरातील बाथरूममध्ये आश्रय घेतला.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर बीट मार्शलचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र पोलिसांच्या आगमनापूर्वीच सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेनंतर इसासनी परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण असून नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





