Published On : Fri, Feb 11th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिके तर्फे शुक्रवारी (११ फेब्रुवारी) रोजी १० प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ७० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत नाग रोड येथील एन.आय.टी.सभागृह, वेलवसिध्द सभागृह आणि जैन मंदीर सभागृह यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु १५,००० च्या दंड वसूल केला.

कच्चीविसा लकडगंज झोन मधील अशोका ईलिते यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला. त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत टेका नाका कामठी रोड येथील गोत्रा लॉन, प्रल्हाद आनंद लॉन आणि ऑटोमोटीव्ह चौक मधील पंजाब लॉन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ३०,००० च्या दंड वसूल केला.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शुक्रवारी (ता.११) धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ एन.आय.टी.कॉम्प्लेक्स येथील स्टार मेन्सवेअर वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.