Published On : Thu, Feb 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिके तर्फे बुधवारी (९ फेब्रुवारी) रोजी १० प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ६५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने हनुमाननगर झोन अंतर्गत गणेश नगर, नरसाळा येथील कैलाश सोमकुवर यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला.

तसेच गांधीबाग झोन अंतर्गत मेन मार्केट महाल येथील राजेश अडबडीया, बजेरिया येथील राजेन्द्र चरडे आणि अर्चना चापले यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २०,००० च्या दंड वसूल केला. त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत ऑटोमोटीव्ह चौक येथील के.एम.सी.मॅरेज लॉन आणि श्री पंजाब लॉन यांच्या विरुद्ध सुध्दा कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु १५,००० च्या दंड वसूल केला.

प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.

Advertisement

बुधवारी (ता.९) धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ येथील आयुष ब्लड बँक यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय पथकाद्वारे लकडगंज झोन अंतर्गत लक्ष्मीनगर कळमना येथील अमीत ट्रेडर्स किराणा शॉप या दुकानावर कारवाई करून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

मनपाद्वारे दररोज मनपा कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान प्रत्येक बाजारपेठेत, भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.