Published On : Thu, Feb 3rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिके तर्फे बुधवारी (२ फेब्रुवारी) रोजी ६ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ४५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत माउंटरोड सदर येथील लिबर्टी रेस्टॉरेन्ट ॲण्ड बार यांच्या विरुध्द रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी कारवाई करुन २०,००० चा दंड वसूल केला.

तसेच हनुमाननगर झोन अंतर्गत महालक्ष्मीनगर, हुडकेश्वर येथील स्पीड ट्रॅक एज्युकेशन झोन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ५,००० च्या दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मेडीकल चौक येथील डोर्लीकर वाईन शॉप यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ५,००० च्या दंड वसूल केला. त्याचप्रमाणे गांधीबाग झोन अंतर्गत संघ बिल्डींग, महाल येथील रघुकुल कॉमर्स क्लासेस यांच्याविरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करुन ५ हजार रुपयाचा दंड वसूल केला.

प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.

गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने गोधीबाग, जुनी मंगळवारी येथील गोपाल प्लास्टिक यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Advertisement

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.