Published On : Wed, Jan 19th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कोविड नियमांचा उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिके तर्फे मंगळवारी (१८ जानेवारी) रोजी ८ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ८० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत अचिर्व्हस एकॅडमी झाशी राणी चौक, सिताबर्डी तसेच जायका मोटर्स सिव्हील लाईन्स यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २०,००० च्या दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत जी.आर.के.कॉन्व्हेंट आराधणा नगर येथे कारवाई करुन २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत पॉवरग्रीड चौक येथील जगत सेलिब्रेशन लॉन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला. तसेच मंगळवारी झोन अंतर्गत बरडे डेव्हल्पर्स, गोधणी रोड, झिंगाबाई टाकळी येथे कारवाई करुन १० हजार रुपयाचा दंड वसूल केला.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.

मंगळवारी (ता.१८) धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धंतोली येथील दर्पण सेल्स कॉटन मार्केट वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Advertisement

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.