Published On : Thu, Mar 24th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरूवारी (ता.२४) धरमपेठ झोन अंतर्गत बिग बाजारच्या बाजुला रामदासपेठ येथील आयुषमान हॉस्पीटल यांच्याविरूध्द मोकळ्या जागेवर इतर सामान्य कचऱ्यामध्ये जैव-वैद्यकीय कचरा टाकल्यामुळे कारवाई करून ३० हजार रूपये दंड वसूल केला.

धंतोली झोन अंतर्गत न्यू मनीष नगर येथील स्वप्नील वरंभे यांच्याकडून बिना परवानगीने शौचालय चेंबरचे बांधकाम केल्यामुळे ५ हजार रूपये दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत गरोबा मैदान येथील नाव्या कूरीयर एक्सप्रेस यांच्याकडून रस्त्यालगत कचरा टाकल्यामुळे ५ हजार रूपयाचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे मंगळवारी झोन अंतर्गत बैरामजी टाऊन येथील नाईक ग्रुप यांच्याविरूध्द रस्त्यालगत बिल्डींग मटेरियल टाकल्यामुळे १० हजार रूपयाचा दंड वसूल केला.

उपद्रव शोध पथकाने गुरूवारी ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.