मुंबई : मराठी संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते यांच्या निधनाने मराठी भावगीतातला शुक्रतारा निखळला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
श्री.तावडे आपल्या शोक संदेशात म्हणतात की, जवळपास 50 वर्षाहून अधिक काळ श्री.दाते यांनी मराठी संगीतासाठी योगदान दिले. ‘..शुक्र तारा मंद वारा, अखेरचे येतील माझ्या, भातुकलीच्या खेळामधली.., स्वरगंगेच्या काठावरती’ अशी विविध एकाहून एक सरस गाणी गाणारे आणि जगण्यावर प्रेम करायला लावणारे गायक श्री.दाते यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Advertisement

Advertisement
Advertisement