Published On : Tue, Jun 16th, 2020

विद्यासागर कला महाविद्यालया तर्फ आयोजित राष्ट्रीयऑनलाइन काव्यस्पर्धेत विनोद राऊत प्रथम

रामटेक: विद्यासागर कला महाविद्यालय रामटेकच्या आय क्यू ए सी विभाग, मराठी विभाग आणि इंग्रजी विभागाद्वारे आयोजित ” कोरोना काळातील संवेदना ” या विषयावर आधारित राष्ट्रीय ऑनलाईन काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

या काव्य स्पर्धेत विनोद राऊत यांच्या ” एअरपोर्ट दिशेने ” या कवितेला प्रथम क्रमांक , कामेश पटले यांच्या “मैं मजदूर हू’ या कवितेला द्वितीय क्रमांक तसेच बळवंत भोयर यांच्या ” नव्या संघर्षाची कविता घेऊन ‘ या कवितेला तृतीय क्रमांक प्राप्त झाले असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेतून संपूर्ण भारतातून 210 कविता प्राप्त झाल्यात .या सर्व कवितांमधून या तीन कवितांची उत्कृष्ट काव्य रचना म्हणून निवड करण्यात आली. या तिनही कवींना अनुक्रमे 1000 रु, 700 रू आणि 500 रू आणि इ- प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सर्व सहभागी कवींना सहभागी झाल्याबद्दल इ – प्रमाणपत्र देण्यात आले. या काव्य स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याबद्दल तसेच स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विद्यासागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार ऍड आशिष जयस्वाल , सचिव श्रीमती अणिताजी जयस्वाल , उपाध्यक्ष प्रा. टी. डी. लोधी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिल्लई यांनी आय .क्यू ए सी चे डॉ .सावन धर्मपुरीवार , मराठी विभाग प्रमुख डॉ. गिरीश सपाटे इंग्रजी विभागाचे प्रा.रवींद्र पानतावणे यांचे अभिनंदन केले.

या काव्य स्पर्धेतील निवडक कवितांचा इ – कवितासंग्रह लवकरच प्रकाशित करण्यात येत आहे.