नागपूर : शहरातील बहुचर्चित विनय पुणेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी शार्प शूटर हेमंत शुक्ला याला नुकतेच लुधियानातून अटक केली होती.आता सदर पोलिसांनी पूणेकर यांना गोळ्या झाडलेली पिस्तुल हरियाणातून जप्त केली आहे.
माहितीनुसार, आरोपी हेमंत शुक्ला याने २३ फेब्रुवारी रोजी राजनगर येथील छायाचित्रकार विनय पुणेकर यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली होती. गर्लफ्रेंड साक्षी ग्रोवरसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरून हेमंतने पुणेकर यांची हत्या केली. त्यांनतर हेमंत फरार झाला होता. हत्येप्रकरणी पोलिसांनी साक्षी ग्रोवर नावाच्या महिलेला अटक केली असून, तिचा प्रियकर हेमंत शुक्ला याने विनय पुणेकरचा खून केल्याचे तिने चौकशीदरम्यान सांगितले होते.
वास्तविक, हेमंत शुक्लाला त्याची गर्लफ्रेंड साक्षी ग्रोवरचे विनय पुणेकरसोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता. तिला मारण्याच्या इराद्याने तो प्रथम साक्षीला नागपुरात भेटला आणि त्यानंतर साक्षी त्याला विनय पुणेकरच्या घरी घेऊन गेली. जिथे हेमंत शुक्ला याने जवळच्या रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडून विनय पुणेकर यांची हत्या केली आणि तेथून पळ काढला.यादरम्यान साक्षी ग्रोव्हरनेही त्याला पळून जाण्यात मदत केली होती. घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी टिपले आणि त्यानंतरच पोलीस साक्षी ग्रोवरपर्यंत पोहोचले. या हत्येपासून नागपूर पोलीस शार्प शूटर हेमंत शुक्लाचा शोध घेत होते. त्यांनतर सदर पोलिसांच्या पथकाने हेमंत शुक्लाला लुधियाना, पंजाब येथून अटक केली. सध्या आरोपी हेमंत शुक्लाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





