Published On : Tue, Mar 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेस नेते विकास ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता !

Advertisement

नागपूर:लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरहून निवडणूक रिंगणात उतरले आहे. मात्र काँग्रेसकडून गडकरींना कोणता नेता टक्कर देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.यातच लोकसभेसाठी भाजपचे नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे नागपूर-पश्चिमचे आमदार विकास ठाकरे हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. विलास मुत्तेमवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली, ज्यात सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, विशाल मुत्तेमवार आदींसह सर्व ज्येष्ठ नेत्यांनी गडकरींविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे यांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवली.अशी माहिती समोर येत आहे. यानंतर विकास ठाकरे यांचे नाव नाव दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडे पाठवले जाईल.त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून अधिकृत घोषणा केली जाईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. आजच्या या बैठकीचे फोटोही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. विकास ठाकरे यांच्या नावाला सतीश चतूर्वेदी सूचक, तर डॉ. नितीन राऊत अनुमोदक आहे, असे सांगितले जात आहे. नागपूरच्या राजकारणात विकास ठाकरे काँग्रेसचे वजनदार नेते मानले जातात.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.