नागपूर : शहरातील सिरसपेठ येथील राज्य कामगार विमा रुग्णालयातील अपुऱ्या आणि अयोग्य सुविधांबाबतचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी हा प्रश्न मांडत रुग्णालयातील परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कामगारांना आवश्यक वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ तसेच मूलभूत सोयींचा अभाव असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या समस्येमुळे लाखो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रश्नावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी प्रकरणाची तत्काळ दखल घेत रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, तसेच लवकरच आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान किंवा अधिवेशन संपल्यानंतर तातडीने रुग्णालयातील सेवा सुधारण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच राज्यातील सर्व राज्य कामगार विमा रुग्णालयांचीही अशाच प्रकारे तपासणी करून आढावा बैठका घेण्यात येतील, अशी माहितीही मंत्र्यांनी दिली. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या लाखो कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...
नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...





