Published On : Tue, Nov 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

विजय वडेट्टीवार यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे केले स्वागत, महायुती सरकारवरही ओढले ताशेरे

Advertisement

चंद्रपूर : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे विरोधी पक्ष नेत्यांनी स्वागत केले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही शुक्ला यांच्या बदलीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे आज स्पष्ट झाले.

गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी महायुती सरकारची होती? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून त्यांना सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती.

असंवैधानिक मार्गाने आलेल्या सरकारने असंवैधानिक मार्गाने अधिकाऱ्यांना पदांवर बसवले होते हे आज स्पष्ट झाले आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग महायुती सरकारने केला होता, असे वडेट्टीवार म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.