नागपूर: शहरात एका भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मर्सिडीज कारने दुचाकीस्वार तरूणांना चिरडल्याने एकाचा जगीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.रितू दिनेश मालू (वय 39, रा. देशपांडे लेआउट) असे मृत तरुणाचे नाव आहे.
माधुरी शिशिर सारडा (३७, रा. वर्धमान नगर) आणि रितिका उर्फ रितू दिनेश मालू (३९, रा. देशपांडे लेआउट) या मर्सिडीज कारमधून (एमएच/४९/एएस/६११११) जात होत्या.
रविवारी पहाटे दीडच्या सुमारास मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) आणि मोहम्मद अतीक मोहम्मद झिया (३२, रा. जाफर नगर) हे दोघे त्यांच्या ॲक्टिव्हावरून रामझुला ओलांडत असताना भरधाव मर्सिडीजने कारने त्यांना धडक दिली. हुसेन आणि अतिक यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, रुग्णालयात पोहोचताच हुसेनला मृत घोषित करण्यात आले, तर अतिकची प्रकृती चिंताजनक होती. संध्याकाळी उपचारादरम्यान अतिकनेही अखेरचा श्वास घेतला.आरोपी चालकाविरुद्ध तहसील पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
छह महीने बाद भी जांच अधूरी, युगेंद्र पयार नाराज #maharastranews #baramati #newsupdate...
नांदेड़ सहकारी बैंक चुनाव, मतगणना आज से शुरू #maharashtranews #nanded #maharashtra #newsupdate...
अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड
बच्चियों से छेड़छाड़ करने वालों को फाँसी तक की सजा मिलनी चाहिए।
पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज
विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग






