Published On : Mon, Sep 11th, 2023
By Nagpur Today Nagpur News

Video: गायींच्या रक्षणाची जबाबदारी कोण घेणार ?

नागपूरच्या धंतोली परिसरातील गो-शाळेची अवस्था दयनीय ; सर्वत्र मलबा अन् घाणीचे साम्राज्य !
Advertisement

नागपूर : गायींच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी उचलण्याचे तसेच त्यांची काळजी घेण्याचे महत्त्वाचे काम गोरक्षण संस्था करीत असते. मात्र हजारो गाईंचा सांभाळ करणाऱ्या गोशाळेला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. शहरातील धंतोली परिसरातील श्रीकृष्ण मंदिर असलेल्या गोरक्षण संस्थेच्या गोशाळेची अवस्था दयनीय झाली आहे. याठिकाणी सर्वत्र मलबा अन् घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने गायी पालनास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत गो- शाळा परिसरातील खोलगट भाग सपाटीकरणकरून गाईंना छत्र निर्माण करून देणे गरजेचे आहे.

ऐन पावसाळ्यांच्या दिवसात शेड नसल्यामुळे परिसरात पाणी साचून सर्वत चिखल झाले ,अशात गायी कुठे राहणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीत गायींना व्याधी आणि इतर रोगांची लागण होत असल्याने त्यांची जीव धोक्यात आले आहे. गौ मातेच्या संरक्षणासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान अध्यात्मात गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे आजही गायींचे पूजन करण्यात येते. गायींमधील काम करण्याची क्षमता संपल्यावर तसेच गायींना व्याधी झाल्या असल्या तर अनेकांतर्फे त्यांना मोकळ्यावर सोडून देण्यात येते किंवा गो-शाळेत दान दिले जातात. अशा गायींवर उपचार करणे, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी शहरात अनेक गो शाळा कार्यरत आहे.


 

View this post on Instagram

 

A post shared by Nagpur Today (@nagpur_today)

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement