Published On : Fri, Nov 3rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

व्हिडीओ : नागपुरात घराघरांतून मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्या तामिळनाडूच्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट १ ने लावला छडा ; 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : नागपूर : मोबाईल आणि लॅपटॉपची चोरी करणाऱ्या तामिळनाडू टोळीचा नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने पर्दाफाश केला आहे. जगदीशन माजीचिन्नय पंझानी (३२), व्यंकटेश शंकर (३५) आणि गोधानधन रंगार मुनुस्वामी (२२) या तीन आरोपींना अटक केली असून या आरोपींवर एकूण १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सोबतच आरोपींकडून १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या तिन्ही आरोपींनी राणप्रताप नगर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, गणेशपेठ पोलीस ठाणे, सक्करदरा पोलीस ठाणे, हुडकेश्वर पोलीस ठाणे, यशोधरा नगर पोलीस ठाणे, अजनी पोलीस ठाणे, गिट्टीखदान पोलीस ठाणे, न्यू कामठी पोलीस ठाणे आणि सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध घरांना लक्ष्य केले होते.

Gold Rate
Feb 12th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,600 /-
Gold 22 KT ₹ 1,46,600 /-
Silver/Kg ₹ 2,64,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राणप्रताप नगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर, गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने या तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement