नागपूर : दिघोरी येथील श्री संतकृपा प्रोव्हिजन या मोबाईल शॉपीमध्ये 35 ते 40 लाख रुपये किंमतीचे 80 हून अधिक मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. 14 सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास तीन चोरट्यांनी शॉपचे शटर तोडून चोरी केल्याचे ससीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले.
याप्रकरणी दुकान मालक सचिन गावंडे यांनी हुडकेश्वर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.
याप्रकरणातील दोन आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथून अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त परी क्र. ४ रश्मीता राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.मोहम्मद मुस्तकीम न उर्फ सलमान वल्द मोहम्मद मुरसलीन ( वय २६ वर्ष, गाजीयाबाद,उत्तरप्रदेश) आणि मोहम्मद शहजाद मोहम्मद फारूख (वय. ४२ रा. शाहजाह कॉलोनी, मेरठ,उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तसेच इकबाल (रा. गाजीयाबाद ,उत्तरप्रदेश) नावाचा आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे राव यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपनीचे एकूण ७२ मोबाईल फोन ज्याची १७ लाख १८ हजार ५४३ रुपये इतकी असून ते जप्त केले आहेत. तसेच इतर आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.