Published On : Mon, Aug 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणारे ‘ते’ दोन पोलीस निलंबित!

व्हायरल व्हिडिओ जुना असल्याची माहिती समोर
Advertisement

नागपूर: शहर पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये नागपुरातील दोन पोलिस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत पोलीस चौकीत बसून जुगार खेळत असल्याचे दिसत आहे.

जुना कामठी रोडवरील कळमना पोलीस चौकीतील हा व्हिडिओ असल्याचे समोर आले असून तो व्हिडिओ जवळपास वर्षभरापूर्वीचा आहे. तसेच आता हा व्हिडिओ समोर आला असून जुगार खेळणाऱ्या त्या दोन पोलीसांना झोन ५ चे पोलीस उपायुक्त अनिकेत कदम यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबित केले.मनोज घाडगे आणि भुषण शाहु साकडे अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांची नावे आहेत.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान जुगार खेळताना दोन निलंबीत पोलिसांव्यतिरिक्त आणखी किती पोलीस होते ? याचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाची चौकशी कामठी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

कळमना पोलीस ठाण्यात दोन पोलीस अंमलदार वर्दी घालून जुगार खेळत असल्याचा व सिगारेट पित असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे नागपूर शहर पोलीस विभागात खळबळ उडाली. परंतु हा व्हिडीओ कळमना पोलीस ठाण्यातील नसून तो जुना कामठी मार्गावरील कळमना पोलीस चौकीतील असल्याचे समोर आले.

Advertisement
Advertisement