Published On : Sat, Jul 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या मेडिकलमध्ये महिला डॉक्टरचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड !

- रुग्णालय प्रशासनाकडून सहा सदस्यीय समितीकडून चौकशी
Advertisement

नागपूर : मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात महिला डॉक्टरांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका महिला डॉक्टरचे दुसऱ्या निवासी डॉक्टरकडून आंघोळ करतानाचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे. येथे महिला व पुरुष डॉक्टरांच्या निवासाची सोय आहे. गुरुवारी रात्री द्वितीय वर्षाला असलेली महिला निवासी डॉक्टर आंघोळीला गेली असताना एका निवासी डॉक्टरने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार महिला डॉक्टरच्या निदर्शनास आल्यानंतर तिने आरडाओरड सुरु केली.

घडलेल्या प्रकाराची अधिष्ठाता कार्यालयात तक्रार करण्यात आली. अधिष्ठात्यांनी तातडीने वसतिगृहाचे वॉर्डन डॉ. गौर व निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींसह बैठक घेतली. संबंधित डॉक्टरच्या मोबाईलची झडती घेतली असता कोणतेही छायाचित्र वा चलचित्र आढळले नाही.

तातडीने चौकशीसाठी उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलेवार, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. गौर, डॉ. मनीष ठाकरे, डॉ. जयेश मुखी यांची सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली. या घटनेसंदर्भात अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनीही दुजोरा दिला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.