Published On : Mon, Nov 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात तलवारी फिरवण्याचा व्हिडिओ टाकणे तरुणांना पडले महागात;पोलिसांनी पाच आरोपींना ठोकल्या बेड्या

Advertisement

नागपूर : तलवारी फिरवत असल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर परिणाम पाच तरुणांना भोगावा लागला. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी या पाच तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यांतर्गत हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तलवारीही जप्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओची माहिती कळमना पोलिसांना मिळाली होती. ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास केला असता, व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व तरुण कळमना पोलिस ठाण्याच्या आवारातच राहत असल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी या पाच तरुणांना शोधून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या घरांची तपासणी केली असता पोलिसांना सहा तलवारीही सापडल्या. अटक करण्यात आलेल्या या तरुणांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.