Published On : Sat, Apr 19th, 2025
By Nagpur Today Nagpur News

Video: भांडेवाडी डंपिंग यार्डला भीषण आग;नागपूरच्या पूर्व भागात धुराचे लोट

Advertisement

नागपूर: भांडेवाडी डंपिंग यार्डला शनिवारी भीषण आग लागली असून, संपूर्ण परिसरात धूर पसरला आहे. चारही बाजूंनी फक्त धुरच धूर दिसत असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे परिसरातल्या पवनशक्ती नगर, सुर्जानगर, संघर्षनगर, अबूमियां नगर आणि तुळसीनगर भागांमध्येही धुराचा परिणाम जाणवत असून नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले आहे.

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या लकडगंज, वाठोडा, कळमणा, सक्करधरा, त्रिमूर्ती नगर, सिव्हिल लाईन्स आणि सुगत नगर येथील गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन जवान प्रचंड मेहनतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रशासनाकडून नागरिकांना सावध राहण्याचे आणि गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.