Published On : Thu, Nov 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

व्हिडिओ; नागपुरात 1.35 कोटींच्या रक्कमेसह अटक केलेल्या ‘त्या’ तरुणाची चौकशी सुरु; सीपी सिंगल यांची माहिती

रक्कमेचा संबंध विधानसभा निवडणुकीशी असू शकतो
Advertisement

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीबर मोठ्या हालचालींना सुरुवात झाली असून या काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी नागपूर पोलीस विभाग सज्ज झाला आहे. यातच नागपूरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली.

काल 13 नोव्हेंबरला पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाकडून 1 कोटी 35 लाख रुपये जप्त केले. पोलिसांनी दुचाकी चालकाला ताब्यात घेतले आहे. साकीर खान हाजी नसीर खान (वय 42, रा. यशोधरा नगर) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना संशय आल्यामुळे त्याला रोखण्यात आले. जवळ असणाऱ्या रोकडबद्दल योग्य व समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.

माहितीनुसार, नागपूरमध्ये पोलीस गाड्यांची कसून चौकशी करत होते. यावेळी दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. पोलिसांपासून नजर चुकवणाऱ्या या व्यक्तीची गाडी पोलिसांनी अडवली. यावेळी त्याची तपासणी घेण्यात आली. यावेळी त्या व्यक्तीकडे तब्बल कोट्यवधी रुपये रोकड स्वरुपामध्ये असल्याचे आढळून आले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूरमध्ये पोलिसांना 1 कोटी 35 लाख कोटी रुपये रोख सापडले. त्याक्षणी पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. आरोपी साकीर खान हाजी नसीर खान हा बिन्नी नावाच्या व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे.ही रक्कम कोणाची आहे? अशी विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसेच पैशाचे कोणतेही कागदपत्रही सादर करू शकला नाही. पोलिसांनी पैसे आणि दुचाकी असा एकूण 1 कोटी 50 कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सिंगल यांनी दिली. तसेच या रक्कमेचा थेट संबंध विधानसभा निवडणुकीशीही असू शकतो, असेही सिंगल म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.