Published On : Fri, Oct 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

व्हिडीओ ; नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर होणार ६० फूटांच्या रावणाचे दहन; यंदा काय आहे खास?

Advertisement

नागपूर: दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा सण साजरा केला जातो. यंदा हा सण १२ ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे.

नागपूरचे कस्तुरचंद पार्क हे रावण दहन कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी रावणाचा ६० फूटांचा पुतळा, ५५ फूट कुंभकरणाचा आणि ४५ फूटांचा मेघनाथाचा पुतळा जाळण्याची त्यांची योजना आहे. या सोहळ्याची नागपूरकर आतुरतेने वाट पाहत आहेत. नागपूर टुडेने यंदा या सोहळ्याचे वैशिष्ट्य काय यावर प्रकाश ठाकला.

सनातन धर्म युवक सभेतर्फे गेल्या 73 वर्षांपासून कस्तुरचंद पार्क येथे हा उत्सव आयोजित करण्यात येतो. या उत्सव हजारो लोकांना आकर्षित करणारी प्रदीर्घ परंपरा कायम ठेवत विशेष ठरणार आहे.हा महत्त्वाचा सण साजरा करण्यासाठी नागपूर सज्ज होत असताना, सनातन धर्म युवक सभेचा वारसा तरुण पिढीला प्रेरणा देत आहे. केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे, तर वाईटावर चांगल्याचा विजय करण्याचा सार्वत्रिक संदेश देणारी परंपरा जिवंत ठेवत आहे.

दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता कस्तुरचंद पार्क (केपी) मैदानावर रावण दहन करण्यात येणार आहे. राक्षस राजा आणि त्याचा मुलगा मेघनाद आणि भाऊ कुंभकरण यांच्या पुतळ्याचे दहन करण्यापूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

रावण दहन म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय-
दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी लंकापती रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला होता. म्हणून या सणाला विजयादशमी असे देखील म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.