Advertisement
नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे काल,गुरुवारी (दि.7 जुलै) नागपूर आणि अकोला जिल्हा दौ-यावर येत आहेत. श्री. कोश्यारी यांचे सकाळी साडेनऊ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल.
स्थानिक प्रशासनाकडून स्वागताचा स्वीकार करुन ते सकाळी पावणेदहा वाजता शासकीय विमानाने अकोल्याकडे प्रयाण करतील.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी पावणेचार वाजता शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
Advertisement