Published On : Fri, Sep 23rd, 2022
nagpurhindinews | By Nagpur Today Nagpur News

विदर्भ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नागपुरात

Advertisement

– विदर्भ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे तीन दिवसीय आयोजन पहिल्यांदाच नागपूरात


नागपुर – भारतीय सिनेयुग प्रोडक्शन अकादमी मुंबई व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ३ दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

23 सप्टेंबरला सकाळी ९ ते सायंकाळी ६ या दरम्यान कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रगतीताई पाटील यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती युवराज आटोने प्रामुख्याने उपस्थित राहतील. सिनेमा प्रदर्शन चिटनविस सेंटर सिव्हिल लाईन येथे आयोजित केले आहे.

२४ ते २५ सप्टेंबरला अनेक व विविध भाषिय सिनेमे नागपूरकरांना पहावयास मिळणार आहे. तसेच शंकरनगर साई सभागृहात भव्य दिव्य पुरस्कार ( विदर्भ सन्मान अचिव्हमेंट अवार्ड ) सोहळा साजरा करण्यात येईल. असे फेस्टिवल डायरेक्टर अनिल कुमार शिंपी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये निमंत्रक युवराज आटोणे डॉ. अनिल वाघ, अनिल कुमार शिंपी, प्रगतीताई पाटील यांची मंचावर उपस्थित होती.