नागपूर:नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, माजी सचिव व यंग इंडियाचे आमचे ज्येष्ठ सहकारी श्री.बबनराव वाळके यांचे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
निर्भिड पत्रकारिता क्षेत्रातील दांडगा अनुभव बातमीचा अचूक स्रोत म्हणून वाळके यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने नागपूर पत्रकारिता क्षेत्रात पसरली आहे. नागपूर टुडेच्या टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
दरम्यान बबनराव वाळके यांच्या निधनावर सर्व स्तरावरून शोक व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत वाळके यांना श्रद्धांजली वाहिली.
नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बबनराव वाळके यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती, अशा शब्दात गडकरी यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
NAGPUR TODAY |TOP - 10 NEWS | 7 JULY 2026 #newsupdate #maharashtranews...
"इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह...
सराफा दुकान से 12.75 लाख के सोने के आभूषण चोरी, महिला के...
बिना दस्तावेज़ बच्चे के प्रवेश पर सवाल ...#newsupdate #news #maharashtranews #nagpurnews





