Published On : Thu, Aug 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीने राजकारण करणे थांबवावे; सुधीर मुनगंटीवार सल्ला

Advertisement

नागपूर : बदलापूर घटनेवर महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.मुनगंटीवार गुरुवारी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ही घटना दुःखद असल्याचे म्हणत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकमताने विचार केला पाहिजे.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंगणघाटमध्ये मुलीला जिवंत जाळण्यात आले. त्यावेळी कोणी राजकारण केले नाही, त्यामुळे या विषयावर कोणी राजकारण करू नये.

काँग्रेसच्या कार्यक्रमाला गेलेल्या उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना मुनगंटीवार म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमात काँग्रेसचा दुपट्टा घातला.ते हे सर्व केवळ जागांसाठी नाही तर भाजपला विरोध करण्यासाठी करत आहेत. दिल्लीत उध्दव ठाकरे तीन दिवस ठाण मांडून बसले.मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.मात्र शेवटी चहापान करून त्यांना परतावे लागले. आगामी काळात काय होईल हे माहिती नाही मात्र महविकास आघाडीचे लक्ष्य भाजपला संपविणे हेच असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.