Published On : Fri, Jun 5th, 2020

कामठी तालुक्यात वटसावित्रीचा सण उत्साहात साजरा

कामठी :-भारत हा सण उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो.सृष्टीतील प्रत्येक सजीव , निर्जीवरप पूजनीय आहे.सारे सणवार ही एक प्रतिके आहेत.समाजात जे जे योग्य आहेत ते टिकले जावे आणि त्यातून एक सुदृढ समाज दीर्घकाळ टिकावा या मुख्य उद्देशाने स्त्रीयांचा खास मानला जाणारा वटसावित्री उत्सव कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यातही सोशल डिस्टन्स पाळण्यात आला हे इथं विशेष!

ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आपलया पतीला उत्तम आरोग्य , दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वट सावित्रीची पूजा करण्यात आली.

यावेळी वट वृक्षांची पूजा व प्रार्थना करण्यात आली.या सनाविषयी जी आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार सावित्रीच्या पतीचे प्राण हरण करण्याकरिया यमराज आला असता तिने पती बरोबरच जाण्याचा हट्ट धरला यमराज स सावित्रीने मागितलेल्या तीन वरास यमाने तथास्तु म्हटल्यामुळे यमास सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हूणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात याच आख्यायिके नुसार आजही वटपौर्णिमेला विवाहितस्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करून त्याभोवती प्रदक्षिणा घातली.

संदीप कांबळे कामठी