Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात धावत्या व्हॅनला आग; चालकाने उडी मारून वाचवला जीव

Advertisement

नागपूर : शहरातील वाढत्या उकाड्यादरम्यान वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.
अशातच गुरुवारी दुपारी नागपूरच्या वाठोडा चौक परिसरात धावत्या मारुती व्हॅनने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच संपूर्ण व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत वाहनातून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाठोडा चौक परिसरातून एक मारुती व्हॅन जात असताना अचानक वाहनातून धूर निघू लागला. त्यानंतर काही क्षणांतच शॉर्टसर्किटमुळे व्हॅनला आग लागली. आग वेगाने पसरत गेल्याने संपूर्ण वाहन आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले.

घटनेची चाहूल लागताच चालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर उडी घेतली. त्यानंतर अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. सूचना मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत व्हॅनचे मोठे नुकसान झाले होते.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही व्हॅन एका ऑटो डीलरची असल्याची माहिती समोर आली असून चालक वाहन ग्राहकाला दाखवण्यासाठी घेऊन जात होता. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, नागपुरात वाढत्या तापमानामुळे वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना वारंवार समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वाहनधारकांनी वेळोवेळी वाहनांची तपासणी करून आवश्यक देखभाल करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या प्रकारामुळे वाहन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Advertisement
25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate  #nagpurnews

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate...

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha #news

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate #maharashtra

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate...

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

फडणवीस की मौजूदगी में आज भव्य तिरंगा रैली #maharashtranews #sambhajinagar #newsupdate #maharashtra

फडणवीस की मौजूदगी में आज भव्य तिरंगा रैली #maharashtranews #sambhajinagar #newsupdate #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges