नागपूर : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ज्यामध्ये नागपूरच्या वैष्णवी बावस्कर हिने उल्लेखनीय कामगिरी करत महिला गटात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीचे अभिनंदन केले आहे.
तर पुरुष्र गटात महेश गहटुळे याने परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
वैष्णवी सध्या मंत्रालयात गृह विभागात सहायक विभाग अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. आता त्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे.
2019 मध्ये वडील गमावलेल्या वैष्णवीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तिची आई एका खाजगी रुग्णालयात काम करत असल्याने, वैष्णवीने तिच्या अभ्यासासाठी तसेच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी खाजगी शिकवण्या घेतल्या. अनेक अडचणींना तोंड देत वैष्णवीने हे स्थान मिळविल्याने तिचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





