नागपूर. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 100 मीटर अंतराच्या शर्यतीत वैभव गवळी आणि नागेश्वरी वडापल्ली यांनी सुवर्ण पदक पटकाविले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथील सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा सुरु आहे. पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत खेलो इंडिया सेंटर च्या वैभव गवळीने 10.80 सेकंदात बाजी मारली. फ्युचर ॲथलेटिक्स स्पोर्ट्स चा गोपाल पालांदूरकर 10.97 सेकंदासह दुसरा आणि लक्षमेध फाउंडेशन चा पुष्पक उके 11.11 सेकंदासह तिसरा आला.
महिलांच्या शर्यतीत नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या नागेश्वरी वडापल्ली हिने 12.95 सेकंदात 100 मीटर अंतर पूर्ण करुन सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली. गुनगुन वानखडे (स्प्रिंटर क्लब) 13.99 (13.989) से. आणि गोजिरी हेमकृष्णा (पीआरडी स्पोर्ट्स ब्रम्हपुरी) 14.22 से. यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. गुनगुन ने रौप्य पदक पटकाविले तर गोजिरी ला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय)
100 मीटर दौड
पुरुष
वैभव गवळी (खेलो इंडिया सेंटर) 10.80 से., गोपाल पालांदूरकर (फ्युचर ॲथलेटिक स्पोर्ट्स) 10.97 से., पुष्पक उके (लक्षमेध फाउंडेशन) 11.11 से.
महिला
नागेश्वरी वडापल्ली (नवमहाराष्ट्र क्रीडा) 12.95 से., अंशू शर्मा (फ्युचर ॲथलेटिक) 13.01 से., स्वाती उके (वॉरियर्स स्पोर्ट्स ॲकेडमी) 13.14 से.
14 वर्षाखालील मुली
माही सुनील (पीआरडी स्पोर्ट्स ब्रम्हपुरी) 13.99 (13.988) से., गुनगुन वानखडे (स्प्रिंटर क्लब) 13.99 (13.989) से., गोजिरी हेमकृष्णा (पीआरडी स्पोर्ट्स ब्रम्हपुरी) 14.22 से.
12 वर्षाखालील मुली
मार्टिन अमेलिया (राइजिंग स्प्रिंटर क्लब) 14.42 से., स्वरा हिवसे (रायझिंग स्प्रिंटर क्लब) 14.80 से., सखी दोरखंडे (टीम) 14.99 से.
12 वर्षाखालील मुले
देवांग हिरुडकर (मदर) 13.12 से., जोनाह मकासरे (टीम) 13.90 से., तबिश अली (स्वराज्य ॲथलेटिक्स) 14.66 से.
18 वर्षाखालील मुली
मॉन्टेरियो ओझान (फ्युचर ॲथलेटिक स्पोर्ट्स) 13.10 से., संयोगिता मिसार (नवमहाराष्ट्र क्रीडा) 13.15 से., किंजल भगत (टीम) 13.73 से.
18 वर्षाखालील मुले
कृष्णन नेविल्ले (फ्युचर ॲथलेटिक स्पोर्ट्स) 11.44 से., दानिश खान (टीएफएफसी तुमसर) 11.56 से., श्रेनिक डोंगरवार (लक्षमेध फाउंडेशन) 11.92 से.
16 वर्षाखालील मुले
राज बोपचे (लक्षमेध फाउंडेशन) 12.13 से., अभिजीतिंग पटवा (स्प्रिंटर क्लब) 12.24 से., शिवशंकर पटेल (एचटीकेबीएस क्लब हिंगणा) 12.32 से.
लांब उडी
35 वर्षावरील पुरुष
निलेश निकोले (एसआरपीएफ) 5.36 मी, विजय दिवासे (स्वराज्य ॲथलेटिक्स) 5.02 मी, दत्ता आशिष (सेल्फ) 4.94 मी.
14 वर्षाखालील मुली
गोजिरी हेमकृष्णा (पीआरडी स्पोर्ट्स ब्रम्हपुरी) 4.56 मी, गायत्री राठोड (यवतमाळ जिल्हा) 4.50 मी, नव्या काळे (ॲथलेटिक क्लब अमरावती) 4.37 मी.
गोळा फेक
35 वर्षावरील महिला
पौर्णिमा सोमकुवर (प्रकाश मेमोरियल) 7.36 मी., प्रमिला पाटील (महा जनको केटीपीएस) 6.70 मी., वैशाली सोमकुवर (सेंट जियानेली कॉन्व्हेंट) 5.87 मी.
35 वर्षावरील पुरुष
मोहन सिंग (फ्युचर ॲथलेटिक स्पोर्ट्स) 11.80 मी., धनराज साखरकर (वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब) 9.70 मी., चंद्रभान कोलते (जीएसएससी पारशिवनी) 9.60 मी.
थाळी फेक
14 वर्षाखालील मुले
जयकुमार कामरू (देवरी) 26.47 मी., अब्बास जमीर (सेंट गियानेली कॉन्व्हेंट) 24.88 मी., अभिनव त्यागी (फ्युचर ॲथलेटिक स्पोर्ट्स) 21.27 मी.
उंच उडी
12 वर्षाखालील मुले
मयांक मस्के (वीर राष्ट्रीय क्रीडा अकादमी) 1.25 मी., आयुध भूरे (वीर राष्ट्रीय क्रीडा अकादमी) 1.20 मी., तबिश अली (स्वराज्य ॲथलेटिक्स) 1.20 मी.