Advertisement
ना. गडकरी यांची प्रमुख उपस्थिती
नागपूर
: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात आजपासून ‘ड्राईव्ह इन वॅक्सीन’ या मोहिमेची ना. गडकरी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
मुंबईप्रमाणे नागपुरातही ‘ड्राईव्ह इन वॅक्सीन’ मोहीम सुरु करण्याचा आग्रह ना. गडकरी यांनी महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याकडे केला होता. सीताबर्डी येथे आज ना. गडकरी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे व अन्य उपस्थित होते.